श्यामची आई  

 

परवा श्यामची आई हा चित्रपट मुलांसोबत बघितला. अपेक्षे प्रमाणे जेमतेम ६०% चित्रपटगृह भरलं होतं.

 

एक गोष्ट हल्ली प्रकर्षाने जाणवते – स्वातंत्र्य पूर्व काळ आणि स्वातंत्र्यासाठी त्याकाळातल्या व्यक्तींनी घेतलेले कष्ट हे आत्ताच्या पिढीला माहीतच नाहीत.

 

कसं माहित असणार म्हणा, लहानपणापासून शाळेत इतिहास म्हणून काय शिकवलं जातं? इंग्रज आणि मुघलांचा इतिहास नाहीतर खोटारड्या देशभक्तांनी केलेली भारतीयांची फसवणूक.

 

एक सुज्ञ पालक म्हणून आपली जवाबदारी आहे मुलांना खरा इतिहास समजावून सांगण्याचा.

 

फाड फाड इंग्रजी बोलणं म्हणजे आपल्याला वाटतं की आपण जग जिंकलंय. परंतु त्या क्रूर इंग्रजांनी ज्या पद्धतीने आपल्या देशात येऊन आपल्या लोकांवर अत्याचार केले हे पाहून जर आपलं रक्त उकळत नसेल तर असं म्हणणं वावगं ठरणार नाही की आपण पुन्हा एकदा पारतंत्राकडे वाटचाल करत आहोत. फरक एव्हढाच कि हे वैचारिक पारतंत्र्य होय.

 

मग आपण काय करू शकतो पुढील पिढी घडवण्यासाठी :

– घरात बोलताना मुलांशी मराठीतच बोला

– मम्मी आणि पप्पा हे फॅड सोडून आई आणि बाबा म्हणायला मुलांना शिकवा

– इंग्रजांनी आपल्या लोकांवर कसे जुलूम केले हे त्यांना समजावून सांगा

– खऱ्या खुऱ्या स्वतंत्र सैनिकांबद्दल त्यांना माहिती करून द्या

– आपला देश मुघल आणि इंग्रजांच्या आक्रमणा आधी कसा सुजलाम सुफलाम होता या बद्दल गोष्टी सांगा

– आपली संस्कृती जपण्यासाठी सणांचं महत्व त्यांना समजावून सांगा

– आपल्या देशा बद्दल आदर वाटेल अश्या गोष्टी त्यांना सांगा

– मुलांवर योग्य ते संस्कार होण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या संस्कार वर्गांना पाठवा

 

तुम्ही म्हणाल कि इंग्रजी बोलायचं नाही तर मग काय अडाणीच राहायचं? बिल्कुल नाही. घरात मराठी बोलायचं याचा अर्थ असा मुळीच नाही कि बाहेर इंग्रजी बोलायचं नाही किव्वा स्पर्धा परीक्षांमध्ये भाग नाही घ्यायचा.

 

हे सगळं करत असताना हे लक्ष्यात राहिलं पाहिजे कि आज आपण जे भावी पिढीला सांगणार आहोत त्यावर अवलंबून आहे येत्या २५ वर्षांत आपल्या देशाचं काय होईल.

 

इज्राईल मध्ये आपण हल्लीच बघितलं काय घडलं त्यामुळे अजून काही बोलण्याची गरज नाही !

 

१६ नोव्हेंबर २०२३